पुणे : एफटीआयआयमध्ये लैंगिक शोषण,विद्यार्थिनीनं केली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार

fti pune

पुणे : पुण्यातील फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. संस्थेतील एका विद्यार्थिनीनं थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून याबद्दल तक्रार केली आहे.

संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या बाबतीत लैंगिक शोषणाची वारंवार तक्रार करुनही एफटीआयआयचे संचालक आणि एफटीआयआय  प्रशासनानं लक्ष दिलं नसल्याचा आरोप या विद्यार्थिनीनं आपल्या तक्रारीत केला आहे. तसंच तक्रार केल्यानंतर आपल्या कामात अडथळे आणण्यात आल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे.

रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप