तुळजापूरकरांच्या १९३५पासूनच्या संघर्षाला फळ; रेल्वे मार्ग अखेर मंजूर

blank

तुळजापूर : तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वेमार्गावर येण्यासाठी 1935 पासुन म्हणजेच निजाम काळापासून तुळजापूरकर रेल्वेमार्गासाठी स्वबळावर संघर्ष करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे रेल्वे मार्गाची घोषणा केली आणि या तुळजापूर रेल्वेमार्गावरच्या विषयला पुर्ण विराम मिळाला आहे. मागील विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सांगितले होते की, सत्ता द्या मी तुम्हाला तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर आणण्याचे आश्वासन देतो, त्यांतर मोदींनी सोलापुरात घोषणा करून साडेचार वर्षात ते पूर्ण करणार आहेत.
तिर्थक्षेञ तुळजापूर 1935 पासुन रेल्वेमार्गावर येत नाही याला सर्वात मोठा अडथळा राजकीय इछाशक्तीचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. तब्बल 83 वर्षानंतर आता तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्ग होणार असल्याने आणि त्याचा मार्ग सुकर झाल्याने सध्यातरी तुळजापूरकर समाधानी आहेत.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे रेल्वे मार्गा येण्यासाठी निजाम सत्तेकाळात म्हणजे 1935ला तात्कालिन जिल्हयाचे खासदार कै. व्यंकटेश नळदुर्गकर यांनी सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गासाठी पहिल्यांदा आवाज उठवला होता. त्यावेळी निजाम सरकारने 25 कोटी रुपये सुद्धा मंजूर केले होते. त्यानंतर मराठवाडा निजाम जोखडीतून मुक्त झाल्यानंतर आपण मुंबई सरकारमध्ये आलो पण याबात कुठलीही माहीती आज पर्यत मिळाली नाही.
त्यानंतर तुळजापूरकरांनी राजकीय विरहीत संघर्ष समिती स्थापन करुन रेल्वेसाठी लढा चालू ठेवला. याला खा.संभाजीराजे त्यांचे सचिव योगेश केदार, तुळजापूर तालुका पञकार संघानेसह विविधसंघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदवून मोठी साथ दिली. मात्र राजकीय इछाशक्ती अभावी हा रेल्वे मार्ग झाला नाही. या काळात स्थानिक रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने आंदोलने करीत राहिले पण त्यांचा आवाज तुळजापूरात राहिला, म्हणजे गल्लीत राहिला दिल्लीत पोहचालाच नाही अशी अवस्था होती.
रेल्वे साठी मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्हातील मंञी, खासदार यांच्या घरासमोर आंदोलने केली गेली. त्याचाच फलित सध्यातरी तुळजापूरकरांना मिळाले आहे.
या पुर्वीच्या लालू प्रसाद, सुरेश प्रभु व आताचे पियुष गोयल वगळता सर्वच रेल्वेमंञ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. २०१०ला रेल्वेमंञी ई अहमद यांनी तर चक्क सोलापूर-तुळजापूर उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग हा अर्थिक दृष्टीने परवडणारा नाही, तो तोट्यात जाईल म्हणून टाळला. त्यानंतर रेल्वे संघर्ष समितीने तो कसा फायदेशिर ठरणार याचे यात्रा काळात म्हणजे शारदीय नवराञउत्सवाचा काळात येणाऱ्या भाविकांची संख्या, प्रवासाची अपुरी सोय, भाविक एस टी टपावर बसून परतीचा प्रवास करतात हे वृत्तपञात आलेले काञणे, फोटो रेल्वेमंञालया कडेपाठवून आकडेवारीसह पटवून देवून रेल्वे मंञालयाचा अर्थिक दृष्ट्या परवडणारा नाही हा समज खोटा असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर रेल्वेमंञी सुरेश प्रभु यांनी 2015ला हा मार्ग प्राधान्य क्रमाने मार्गी लावू असे आश्वासन दिले. सध्याचे रेल्वे मंञी यांनी तुळजापूर रेल्वे मार्ग होण्यासाठी दिल्ली दरबारी हालचाली सुरु केल्या, यात त्यांना श्रीतुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे मोठे सहकार्य लाभले. यात मुखमंञी देंवेद्र फडणवीस, वाहतूक मांञी नितीन गडकरी, रेल्वेमंञी पियुष गोयल यांनी वरिष्ठ स्तरावरून हालचाली करून हा रेल्वे मार्ग होण्यासाठी चालना दिली.
त्यानंतर विनानसभा निवडणूक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी तिर्थक्षेञ तुळजापूर यृथे आले असता त्यांनी देशात राज्यात भाजपा सत्तेवर आल्यास तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर आणण्याचे जाहीर सभेत आश्वासन दिले होते.
त्यानंतर भाजपची सत्ता मिळाली . नंतर श्रीतुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीने पुन्हा हा मुद्दा उचलून थरला . पंतप्रधान मोदी, पियुष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु केला. तसेच छञपतीसंभाजीराजे यांनी ही तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्ग होण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु केल्या. यातच श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे तात्कालिन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची रेल्वेमंञी पियुष गोयल यांचे सचिव म्हणून नियुक्ती होताच या रेल्वे मार्गास आणखी चालना मिळाली. अखेर २०/०७/२०१८ रोजी मंजुरी घोषणा झाली. त्यानंतर 9जानेवारी 2019 रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गाची घोषणा केल्याने गेली अनेक वर्षाचा तुळजापूर करांचा भाविकांचा संघर्ष कामी आला असल्याचे बोलले जात आहे.