मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता फळ उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध; जागा अधिग्रहणाचा मुहूर्त हुकणार

bullet train

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन पुढील अडथळ्यांची मालिका सुरूच आहे. आता बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या जागा देण्यास पालघरमधील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जपानची तब्बल १७ बिलियन डॉलरची फंडिंग असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामास उशीर होणार आहे.

Loading...

‘नेटवर्क १८’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांकडून होणारा वाढता विरोध पाहता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने आता सर्व गोष्टींवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आंबा, चिक्कू आणि इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चेने मार्ग काढण्यात येईल असा विश्वास जपानला व्यक्त केला आहे.

६३ वर्षीय शेतकरी दशरत पुरव यांची चिकूची बाग देखील बुलेट ट्रेनच्या मार्गात येते. मात्र, त्यांनी ही जागा सरकारला देण्यास कडाडून विरोध केला आहे. ते म्हणतात, चिक्कूची बाग उभारण्यासाठी मी तीन दशकांपर्यंत कठोर परिश्रम घेतले आहेत, सरकार आता मला या जागेचा ताबा देण्याची मागणी करत आहे. कष्टकरून ही बाग मी सरकारच्या हातात देण्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी तयार केलीय. तसेच जर माझ्या मुलांना नौकरी देण्याची हमी सरकारने दिल्यास आपण जागा देयला तयार असल्याचही ते सांगतात.

मोठ्या प्रकल्पांना जमीन देण्यास होणारा विरोध आपल्या देशात नवीन नाही. नुकतच ४४ बिलियन डॉलरचा प्रकल्प असणाऱ्या नानार ऑईल रिफायनरीला झालेला विरोधही आपण पाहिलेला आहे. मात्र, अशा विरोधामुळे प्रकल्पांची वाढत जाणारी खर्चाचा फटका देखील सहन करावा लागतो. तीच गोष्ठ बुलेट ट्रेनच्या बाबतही होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांशी वाटाघाटीकरून त्यांना योग्य तो मोबदला दिला जाणार असल्याच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारकडून जरी तोडगा काढण्याच बोलल जात असल तरी राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांकडून बुलेट ट्रेनला होणारा विरोध आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...