‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना नवीन गाळप परवाने देऊ नयेत – राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : येत्या १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरु होत आहेत. राज्य शासनाने तशा गाईड लाइन्सही जाहीर केल्या आहेत. परंतु अद्यापही गेल्या वर्षीच्या ऊस उत्पादक शतकऱ्यांना त्यांचा ‘एफआरपी’ मिळाला नाहीए. जो १४ ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असत. आणि म्हणूनच जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा गेल्या वर्षीचा ‘एफआरपी’ मिळत नाही तोपर्यंत ‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना या वर्षी गाळप परवाने देऊ नयेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तशा प्रकारचे एक निवेदन पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :