भीमसैनिकांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण

पुणे – भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये निष्पाप बळी गेलेल्या राहुल फटांगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करून अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी भीमसैनिकांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण केले.

भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये निष्पाप बळी गेलेल्या तरुण बांधव कै. राहुल फटांगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जातीवादी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करून भारतीय दंड विधान कलम ३०२ व अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी भीमसैनिकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरु केले.

या उपोषणामध्ये भारत कांबळे, भिकूजी पौर्णिमा, अतिक मोमीन, अशोक आठवले, इकबाल अन्सारी, अमीन कुरेशी, कृष्णा सोनकांबळे, किरण जगताप, रमा आठवले, निलेश आल्हाट, इम्तियाझ पठाण, जमीर शेख, जावेद खान, अहमद सय्यद व मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते

You might also like
Comments
Loading...