fbpx

सीरीयातील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

औरंगाबाद : सीरीयातील निष्पाप नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ औरंगाबाद मुस्लिम कमिटीतर्फे  आज नमाजनंतर दुपारी आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला .सीरीयातील भीषण युध्दात असीमीत बॉम्ब हल्ल्या मध्ये नागरिकांचा जीव जात आहे. तेथील हल्ल्यातील होरपळलेली लहान मुले , महिलांची मन हेलकावनारी चित्रफीती व्हायरल होत आहे .या अपरिमित अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आसुन यात विविध संघटना सर्व जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते .