fbpx

‘मी आज पासून प्रियांकाला देशाच्या हवाली करत आहे’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षाने प्रियांका गांधी हे नवे अस्त्र बाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली असून आज लखनऊ मध्ये भव्य रॅली काढून कॉंग्रेसने आपले शक्ती प्रदर्शन केले आहे. या रॅलीला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तर प्रियांका गाधी यांचे पती रॉबर्ट वाड्रां यांनी आपल्या सोशल नेट्वर्किंग साईट वरून ‘मी आज पासून प्रियांकाला देशाच्या हवाली करत आहे’ अशा आशयाची भावनिक पोस्ट केली आहे.

प्रियांका गांधी यांनी आता सक्रीय राजकारणात उडी घेतली आहे. तर रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पत्नीस उत्तर प्रदेशातील नव्या प्रवासासाठी तूला मनापासून शुभेच्छा, तसेच भारतीयांच्या सेवेसाठीही प्रियांका यांना रॉबर्ट वाड्रां यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान लखनऊमध्ये निघालेल्या प्रियांका यांच्या रॅलीला लखनऊवासियांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे तर या रॅलीमध्ये ‘आ गई बदलाव की आँधी…. राहुल संग प्रियांका गांधी’, अशा घोषणा दिल्या जात आहेत