आज पासून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : अमरावती नागपूर महामार्ग आणि मनमाड मध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आज पासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्याचबरोबर राज्यभर धनगर समाजाने आरक्षणासाठी आवाज उठवला आहे. या आंदोलकांची प्रमुख मागणी अनुसूचित जातीमध्ये समावेश करून घ्यावा अशी आहे.

धनगर आणि धनगड अश्या दोन जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र धनगर आणि धनगड ही प्रशासकीय चूक आहे राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. असं पत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावर यांनी हायकोर्टात दिल आहे. त्यामुळे १ सप्टेंबर च्या आता ही चूक दुरुस्त केली नाही. तर ५ लाख धनगर मिळून औरंगाबाद येथे एल्गार पुकारतील असं इशारा यापुर्हीच धनगर समाजाने दिला आहे.

आघाडी सरकारच्या काळात जेव्हा हा प्रश्न पेटला होता तेव्हा स्वतः हा देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर गेले. आणि धनगर समाजाला आश्वासन दिल की सत्तेत आल्यावर पहिल्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू मात्र चार वर्षानंतर हि आरक्षण अजून घोंंगडीतच आहे.

Rohan Deshmukh

या मुद्यांच्या आधारे आरक्षणाची मागणी :
-कोणत्याही राज्यात धनगर किवा धनगड असो उच्चार एकाच असल्याचा दावा.
-वर्षाय्नुवर्ष धनगर समाजाचा मेंढा पालनाचा व्यवसाय. 
-बिहार आणि झाराघंद मध्ये धनगरांचा समावेश अधिवासी जमातीत.
-नुत्य गायन  देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती.

 

संविधान बदलण्याचा काँग्रेस – भाजपचा डाव – आंबेडकर

Latur Advt
You might also like
Comments
Loading...