आजपासून कोल्हापूर – तिरुपती विमानसेवा सुरू

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – तिरुपती विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. यासाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विमानतळावरुन दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-तिरूपतीसाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे.

तिरूपतीसह कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर ‘इंडिगो’ कंपनीकडून विमानसेवा सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या विमानसेवेबरोबर कोल्हापूरचीही विमानसेवा विस्तारत असून, यापुढे कोल्हापूर विमानतळावर दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर दोन सेवा उपलब्ध होणार आहेत.