शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा रुग्णालयात मृत्यू भासवण्यात आला असल्याचा आरोप बाळासाहेबांवर निलेश राणे यांनी केला आहे.त्यावरूनच आज मोहोळ शिवसेनेच्या वतीने निलेश राणेंच्या आरोपाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला व निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून राणेंविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Loading...

आज सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील युवा सेना व शिवसेना यांच्यावतीने निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाबद्दल निषेध व्यक्त केला, तसेच त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची चक्क कुत्र्यावरून धिंड काढण्यात आली.यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख,शिवसेना नेते नागेश वनकळसे, शहर प्रमुख रणजीत गायकवाड,सुरज देशमुख,हर्शल देशमुख यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश राणेंचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याअगोदर पोलीसांनी तो ताब्यात घेतला व शिवसेना कार्यकर्त्यांना समन्स देऊन सोडण्यात आले.

माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.त्यानंतर कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या सांगण्यावरूनच दोन शिवसेना नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला व त्यानंतर त्यांच्या हत्या झाल्याही अशा शब्दात थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.Loading…


Loading…

Loading...