रिझर्व्ह बँके कडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर, विनातारण शेतीकर्जमर्यादा वाढवली

टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व्ह बँके कडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. शेतकऱ्यांना आता विनातारण १.६० लाख रुपयांचे शेतीकर्ज मिळणार आहे. वाढलेल्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेवून रिझर्व बँकेने शेतकऱ्यांच्या शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख एवढी वाढवली आहे.

याआधी शेती कर्जाची मर्यादा १ लाख होती. पण जर शेतकऱ्यास यापेक्षा अधिक कर्जाची गरज असेल तर त्यास वस्तू किंवा जमीन तारण ठेवावे लागत असे. पण रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यास १.६० लाख एवढे कर्ज कोणतीही वस्तू तारण न ठेवता मिळणार आहे. त्यामुळे रिझर्व बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

दरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच रिझर्व बँक शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी समिती देखील बनवणार आहे.