fbpx

आरक्षणाच्या मुद्यावरून मोहन भागवत पुन्हा वादाच्या भोवऱ्यातंं

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा छेडला आहे. जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि जे विरोधात आहेत, त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी असे वक्तव्य केले आहे.

याआधी ही मोहन भागवत यांनी आरक्षणावर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर देशभारातून प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी देशातील आरक्षणावर भाष्य केलं आहे.‘जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि जे विरोधात आहेत, त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी. मी आधीही आरक्षणाबद्दल बोललो होतो, पण तेव्हा मोठा गदारोळ झाला आणि खऱ्या मुद्द्यावरून चर्चा भरकटली. पण जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत त्यांनी विरोध करणाऱ्यांच्या हिताकडे पाहिलं पाहिजे. तसंच जे विरोध करणारे आहेत त्यांनीही तसंच करावं,’ असं मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हंटले आहे.

मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वाद होण्याची चर्चा आहे. सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. अशा वातावरणात भागवत यांनी आरक्षणाचा मुद्द्याला हात घालून धोक्याची घंटा वाजवली आहे. 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीआधीही आरक्षणाबाबत असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये वातावरण पूर्णपणे बिघडल होतं.