मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून ‘श्रीरंग अप्पा’च

पुणे : मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झालं आहे. कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल दिले आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांशी संवाद साधण्यासाठी उध्दव ठाकरे काल पुणे दौ-यावर होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा, ग्रामीणअंतर्गत येणा-या लोकसभा, विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. मावळ लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक दुपारी पार पडली. या बैठकीला मावळ मतदार संघात येणा-या सहाही विधानसभा मतदार संघातील जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विभागप्रमुखांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांनी जनतेच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडली असल्याचे सांगत ठाकरे यांनी बारणे यांच्या कामाचे कौतुक केले.

तर दुसऱ्या बाजूला शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. आढळराव चौथ्यांदा लोकसभा लढविणार आहेत. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

धाराशिव (उस्मानाबाद )चा गड कोण राखणार?

जाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द 

रजनीकांतच्या पत्नीने घेतली राज ठाकरेंची भेट