Uddhav Thackeray | मुंबई : सोमवारी पुणे (Pune Rain) शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काहीवेळातच पावसाने चांगलाच जोर धरला. पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपवर (BJP) जोरदार टिका करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray )यांच्या ‘सामना’च्या (Samna) अग्रलेखातून पुणे पावसावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे सामनामध्ये (Samna)
सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेत, असं म्हणत सामनामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच हल्ला केला आहे. ‘आयटी’ ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा पाणउतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे..
स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये. त्यापाठोपाठ पुण्यात गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी भरतेय. धो धो पाऊस पडल्यानंत रस्त्यांवर फूट-दोन फूट पाणी तासंतास साचून राहते.
पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावू, शोभेची कामे करण्यातच रस दाखविला गेला. जलव्यवस्थापन, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते अशा मूलभूत कामांचे नियोजन करण्याऐवजी सुशोभिकरणाचा डोलारा करण्यातच महापालिकेचे कारभारी मश्गूल राहिले. कचरा व्यवस्थापनावर कोटयवधी रुपये खर्च होऊनही राष्ट्रीय स्वच्छ शहर स्पर्धेत पुण्याचे मानांकन घसरते तेव्हाच विकासाच्या गप्पा आणि थापा लक्षात येतात. शहराची वाट्टेल तशी बेभरवशी वाढ आणि नियोजनाचे मार्ग तुंबल्यामुळे शहराची बकालतेकडे वाटचाल होत असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! गौतम अदानी नंतर अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- Rupali Thombre | “छुपी युती असेल किंवा नसेल ती जगजाहीर करा, कटकारस्थान करू नका”
- Shinde-Fadanvis Govt | सीबीआयला राज्यात एन्ट्री करायला सरकारच्या परवानगीची गरज नाही – शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय
- Sunil Raut | न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde | “तुम्ही रात्री, अपरात्री…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला