पालिकेच्या वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांच्यासंदर्भातील ‘तो’ मजकूर गायब

BhausahebRangari

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावर्षीही नव्याने परत एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे, कारण भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केल्याची माहिती देणारा मजकूर पालिकेने हटवला आहे.

शुक्रवारी पुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सव सुरु केला अशी माहिती प्रसिद्ध केली होती. यावरुन वाद झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे.