महाराष्ट्रातून 81 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना

blank

टीम महाराष्ट्र देशा : केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यावधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. अश्यातच मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे रवाना झाली आहे.

त्याचबरोबर देशाच्या विविध राज्यांतून देखील डॉक्टर्सच्या टीम केरळला दखल झाल्या आहेत. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होऊ शकतो. अशी भीती वर्तवली जात आहे. उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीच्या आजारांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सांभाळणाऱ्या अनिल वासुदेवन यांनी सांगितले आहे.

केरळमध्ये महापूर ; ओणम साजरा न करण्याचा निर्णय