खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणाने १० वर्षांत घेतले ७० जणांचे प्राण

accident

सातारा : सातारा – पुणे लेनी घाट नवीन बोगद्याचे पुढे असलेले प्रचंड धोकादायक एस आकाराचे वळण असून या वळणावर गेल्या 10 वर्षांत एकूण 36 मोठे अपघात झाले असून यात 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या जिल्हा प्रशासनाला जाग केव्हा येणार अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व वाहतुकमित्र मधुकर शेंबडे यांनी बोलताना दिली आहे. याबाबत शेंबडे यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत सातारा पुणे लेन खंबाटकी घाट नवीन बोगद्याचे पुढे असलेल्या धोकादायक एस आकाराचे वळणावर मोठे व गंभीर अपघाताची माहिती लेखी अर्ज देवून प्राप्त केली आहे.

खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.एस.हांडे यांनी दिलेल्या माहितीमध्ये सन 2008 मध्ये मोठे अपघात 5 झाले यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. सन 2009 मध्ये 4 अपघात झालेे त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. सन 2010 मध्ये 4 अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला.सन 2011 मध्ये 5 अपघाता 8 जणांचा मृत्यू झाला. सन 2012 मध्ये 3 अपघात 3 जणांचा मृत्यू झाला. सन 2013 मध्ये 2 अपधातत 2जणांचा मृत्यू झाला. सन 2014 मध्ये 6अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सन 2015 मधये 4 अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. सन 2016 मध्ये 3 अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. यावर्षी सन 2017 मध्ये खंडाळा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात विविध अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 10 वर्षात खंबाटकी घाटात धोकादायक एस वळणावर एकूण 36 मोठे अपघात होवून एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 10 वर्षांत गंभीर स्वरूपाचे 46 अपघात होवून 154 जण गंभीर जखमी झाल्याची नोंद खंडाळा ठाण्याच्या डायरीमध्ये आहे.