आयुक्तांनी फिरवली लोकशाही दिनाकडे पाठ;संतप्त नागरिकांची घोषणाबाजी

KUNAL

पुणे :लोकशाहीला दिनाला महापालिका आयुक्तांची दांडी मारल्याने महानगरपालिकेत काही वेळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले . पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला गैरहजर राहत असल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत गोंधळ घातला.

महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार हे मनमानी कारभार करत असल्याच वारंवार समोर येत आहे .नागरिकांच्या समस्या प्रशासनाने ऐकाव्यात आणि त्याची दखल घेतली जाऊन या समस्या सुटाव्यात म्हणून दर महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांना गोरगरिबांच्या समस्या सोडवणे तर दूर परंतु त्या जाणून घेण्यात देखील कोणतेही स्वारस्य नसल्याचे समोर आले आहे .

आज पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला गैरहजर राहत असल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत गोंधळ घातला. त्यामुळे आयुक्त कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात करण्यात आले. आत मध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी बाहेर येत असताना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप नागरिकांनी केला.2012 सालापासून सुरू असलेल्या लोकशाही दिनाला आयुक्त सहा महिन्यातून एखाद्यावेळी हजेरी लावतात.त्यातच आज अचानक नागरिकांनी तक्रारी क्षेत्रीय कार्यालयात नोंदवाव्यात आणि तेथून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आयुक्तांकडे यावे असा नियम प्रशासनाने जाहीर केला.त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.