’83’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणवीर सिंग याचा आगामी चित्रपट 83 चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर कपील देव यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. रणवीर सिंगचा आज ३४ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसा निमित्ताने सोशल मीडियावर रणवीरने ’83’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे.

Loading...

हा चित्रपट 83 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर (१९८३) आधारित आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन ही या चित्रपटात कपील देव यांची पत्नी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण दोघही इंग्लंडमध्ये आहेत.

दरम्यान, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या संघाची कथा या चित्रपटात आहे. या संघाने १९८३ मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडिअममध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.Loading…


Loading…

Loading...