मित्रपक्षाने रडीचा खेळ खेळु नये,काय ते सरळ करा! शरद पवारांनी कॉंग्रेसला फटकारले

sharad pawar pune

पुणे: आमचा रस्ता सरळ असताना काँग्रेस दुसरा रास्ता चालते, यावर विचार होण गरजेचं आहे. मित्रपक्षाने रडीचा खेळ खेळु नये, काय ते सरळ करा!,या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसला फटकारले.

पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं , यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची एकमुखाने घोषणा करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली. यावेळी शरद पवार बोलत होते.

“मी विरोधी पक्षात असतो तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो, कारण राज्यात तळागाळातील लोकांना भेटायला मिळत, लोकांशी चर्चा होते, त्यामुळे सत्तेत नसलेला काळ अत्यंत महत्वाचा आहे. सत्ता नसताना एका आव्हानाला समोर जाण्याची भूमिका घ्यावी लागते”. असे शरद पवार म्हणाले,

शरद पवार म्हणाले, आज देशात  दलित, आदिवासी, महिलांचा मनामध्ये अस्वस्थता आहे. आगामी पोटनिवडणुकीत मित्र पक्षांशी बोलून समन्वयाची भूमिका घेणार, सांगली जिल्ह्याच्या जागेचा विचार करावा लागणार आहे. आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार असून लातूर-उस्मानाबाद-बीडच्या विधानपरिषद जागेसाठी दावा करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

इव्हिएम मशीन संदर्भात बोलतांना शरद पवार म्हणाले, इव्हिएम मशिनकडे सुध्दा आपल्याला लक्ष द्यावे लागेल. लोकांच्या मनात ईव्हीएम मशीन बद्दल शंका आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हणायचे पण सध्याचे प्रधानमंत्री जेव्हा बोलायची गरज आहे तेव्हा बोलत नाहीत. असेही पवार म्हणाले