मुंबई : यूट्यूबर भुवन बाम आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. भुवनने गेल्या आठवड्यात आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत भुवनने पहाडी महिलांविषयी एक अक्षेपार्ह विधान केल्यानं सारं पुढचं रामायण घडल्याचं बोललं जात आहे.
लेखक आशिश नौटियालने या व्हिडीओतला एक छोटासा भाग शेअर केला आहे. ज्यात भुवननं एक व्यक्तिरेखा साकारली आहे, जी शूटिंगसाठी अॅटोमॅटिक कारची डिमांड करीत आहे. एका कार मॉडेलविषयी चौकशी करण्यासाठी तो डिलरला बोलावतो. पण हा शब्द दोन अर्थानं वापरला आहे. डिलर म्हणजे ‘जे महिलांची तस्करी करतात’ अशा अर्थानं तो या व्हिडीओत वापरला आहे.
या व्हिडीओत भूवननं साकारलेली व्यक्तिरेखा आपल्या मित्राला विचारतेय,’पहाडन है, कितना देती है?’ आणि हे तो अगदी काव्यात्मक ओळी वगैरे गाऊन बोलतात तसंच विचारताना तो दिसत आहे. त्याच्या याच भाष्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने यूट्यूबर भुवन बाम वर कारवाई करावी असे दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
या संदर्भात, राष्ट्रीय महिला आयोगाने गुरुवारी नुकतेच एक ट्विट केले आणि म्हटले, “NCW India” ने याची दखल घेतली आहे. अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून FIR नोंदवून याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणाऱ्या यूट्यूब चॅनलवर योग्य ती कारवाई करण्यासाठी ने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले असल्याचं देखील समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या :