रेल्वे स्थानकावर येणाऱ्या चोरवाटा होणार आता बंद

टीम  महाराष्ट्र देशा – सोलापूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्वच चोरवाटा आता बंद होणार आहेत. प्रवासी आणि यार्डच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रामवाडीच्या दिशेने असलेल्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने संरक्षक िभंत बांधली होती. त्याला अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे चोर, अनधिकृत विक्रेते, तृतीय पंथीयांना स्थानकावरील फलाटावर सहज प्रवेश करता येई.

आता त्याला आळा बसणार आहे. नव्या निर्णयामुळे स्थानकाभोवती १० फूट उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. त्यावर फुटाचे तारेचे कुंपण घातले जाणार आहे. त्यामुळे चोरवाटा बंद होण्यास मदत होईल. पर्यायाने स्थानकावर चोरी करून पळून जाणे अवघड होणार आहे. सोलापूर रेल्वेस्थानकावर रामवाडीच्या दिशेने अनेक जण अनधिकृतरीत्या प्रवेश करतात आणि निघून जातात. अनेक चोरटे याच मार्गाने येतात आणि जातात. सोलापूर स्थानकाच्या वाडीच्या दिशेने असलेल्या टर्नआऊटवर गाडी थांबली असता चोरटे डब्यातील महिल्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून लगेच पसार होतात.

सिग्नलवर गाडी थांबली की चोरटे पळून जातात. त्यामुळे पकडणे मुश्किलीचे होई. आता मार्ग बंद होणार असल्याने चोरी थांबेल. जयण्णाकृपाकर, सुरक्षा आयुक्त, आरपीएफ वर्षभरात १८२ चोऱ्या, ३२ मोबाइल चोरीला स्थानकावर वर्षभरात १८२ चोरीचे प्रकार घडले आहे. यात बॅग, सोन्याचे दागिने, मोबाइल चोरी आदी प्रकारच्या चोरीचा समावेश आहे. बॅग चोरीच्या ८० घटना घडल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेने यात १० टक्यांनी वाढ झाली. मंगळसूत्र चोरीच्या घटना ७० घडल्या आहेत. तर ३२ प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेले.