fbpx

लगातार बलात्कार फडणवीस सरकार ‘गुनाहागर’

महिला कॉंग्रेसच्या

मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मंत्रालयाशेजारील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांच्या नेतृत्वात फडणवीस सरकार विरोधात मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक घोषणा फलक दाखवून सरकारप्रती रोष व्यक्त करण्यात आला. ‘लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुनाहागर’, ‘बडते जाते महिलाओ पे अत्याचार कहा है फडणवीस सरकार’ असे फलक लावण्यात आले. महिलांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून निदर्शने केले.