पुण्यात निवडणुकांपूर्वी चालु केलेली ‘फ़्री’ अनलिमिटेड वायफाय सुविधा बहुतांश ठिकाणी बंदच!

free wifi

पुणे:- निवडणुका म्हंटल की आश्वासनांची खैरातच असते मग ते लोकसभा निवडणुकांपासून ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत. त्यामधे वेगवेगळे प्रकारचे आश्वासन दिले जातात पण सध्या तरुणाईना हवहवस वाटनार फ्री तेही अनलिमिटेड वायफायची क्रेज जरा जास्तीच दिसत आहे. त्यामुळे निवडणुकांमधे इच्छुक उमेदवार या फ्री वायफाय आपल्या भागांमधे चालू करण्यावर जास्ती जोर देत आहेत. पण आता पुण्यात पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ज्या ठिकाणी फ्री वायफाय सुविधा देण्यात आल्या होत्या त्या आता बहुतांश बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.

तरुणाईना खास आकर्षित करता याव यासाठी उमेदवार अनलिमिटेड फ्री वायफाय सेवा चालु करतात व अगदी काही दिवसांमधे ती सुविधा धुळखात पडलेली असते. पुणे शहरात प्रामुख्याने टिळक रोड, पर्वती पायथा, डेक्कनचा काही भाग, सदाशिव पेठ, धनकवडी परिसर, नवी पेठ या भागांमधे चालु करण्यात आलेले फ्री वायफाय सुविधा सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हे केवळ फक्त निवडणुकांपर्यंतच मर्यादित ठेवतात अश्या प्रतिक्रिया तरुण वर्गातुन उमटताना पहायला मिळत आहेत.

आम्हाला फ्री वायफाय देऊन आकर्षित केल जात परंतु निवडणुका झाल्यानंतर ती सुविधा परत बंद केली जाते हे जरी असले तरीपण आता जिओ असल्यामुळे आम्हाला त्याच काहीच फरक पडणार नाही.
– नितीश माने (विद्यार्थी)

महाराणा प्रताप बागे जवळ मागील एक ते दीड वर्षापूर्वी वायफाय सुविधा चालू करण्यात आली होती पण सध्या रिचार्ज संपल्यामुळे नेट बंद आहे. रिचार्ज करून सुविधा चालू करण्यात येईल
-रुपाली पाटील

 

गेल्या आठ महिन्यापासुन स्पंदन बिल्ड़िंग जवळ ही सुविधा चालू करण्यात आली होती ती सध्या चालू आहे या फ्री वायफायच उद्घाटन अजित दादानच्या हस्ते करण्यात आले होते.

-सचिन दोड़के (नगरसेवक)