जिओचा धमाका.. स्मार्टफोन फ्री

वेबटीम : ‘हवं तेवढं फुकट बोला, हवे तेवढे एसएमएस फुकट करा आणि इंटरनेटही फुकट वापरा’, अशी ‘जिओ ऑफर’ देऊन गेल्या वर्षी मोबाइल विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्सनं आज मोफत ‘जिओ फोन’ची घोषणा करून ग्राहकांना सुखद धक्का आणि प्रतिस्पर्ध्यांना ‘जोर का झटका’ दिला आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी हा फीचर फोन लाँच केला.
रिलायन्स जिओला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलाअन्सच्या अॅन्युअल जनरल मिटींगमध्ये याची घोषणा केली. हा स्मार्टफोन ५०० रुपये किंमतीचा जरी असला तरी तो ग्राहकांना फुकटात मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १५०० रुपयांचं डिपॉझिट भरावं लागणार आहे, हे डिपॉझिट ग्राहकांना ३ वर्षानंतर पुन्हा मिळणार आहे. हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
सर्वात स्वस्त स्मार्टसोबतच जिओच्या नवीन ‘दे धना धन’ प्लॅनचीही घोषणा यावेळी करण्यात आली. या प्लॅननुसार १५३ रुपयात ग्राहकांना अनलिमिटेड डेटा एका महिन्यासाठी मिळणार आहे. तसेच फ्री कॉलिंग आणि एसएमएस या सुविधाही या प्लॅनमध्ये असतील. १७० दिवसात १० कोटी ग्राहक जिओसोबत जोडले गेले. तसेच ६ महिन्यात डेटाचा वापर ६ पटीनं वाढला असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
जिओच्या फीचर फोनमध्ये काय मिळणार?
– सर्व जिओ अॅप्स अगदी मोफत असतील.
– लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा
– जिओचा फोन मोफत मिळणार
– आयुष्यभर मोफत बोलता येणार
– नवीन फोनमध्ये 153 रुपयांमध्ये धन धना धन’
– अमर्यादित डेटा मिळणार
– 1500 रुपयांचे 3 वर्षांसाठी सुरक्षा ठेव जमा करावे लागणार
– तीन वर्षानंतर सुरक्षा ठेव परत (रिफंड) मिळणार
– जिओच्या व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा
– जिओच्या फोनमध्ये असेल 22 भाषांचा समावेश
24 ऑगस्टपासून करता येणार प्रीबुक
– जिओचा नवा स्मार्ट 4जी फोन 24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येणार
– प्रत्येक आठवड्याला 5 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार
– फोन ‘मेड इन इंडिया’ असतील
जिओचा फोन कसा बुक कराल?
जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल.