शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते आणि किटकनाशके देणार – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

राज्य सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते आणि किटकनाशके देण्याचा विचार करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे बाजारामध्ये शेतमालाचे भाव कमी झाल्यासं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी राहिल्यानं त्यांना त्याचा जास्त फटका बसणार नाही, ही या मागची भूमिका असल्याचं पाटील म्हणाले. येत्या दोन महिन्यांमध्ये शेतमजुरांना देखील रोजगार हमी योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.