जोपर्यंत उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रकार बंद होणार नाही तोपर्यंत मोफत तांदूळ बंद- किरण बेदी

टीम महाराष्ट्र देशा: पुद्दूचेरीच्या नायब राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी हागणदारीमुक्त आणि स्वच्छता नसलेल्या गावांना सरकारकडून मोफत तांदूळ मिळणार नाही. असा इशारा दिला त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रकार बंद व्हावे, गाव कचरामुक्त व्हावे, यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याचे संकेत किरण बेदी यांनी दिले. त्या म्हणाल्या, गावात शौचालय बांधण्याच्या तसेच गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहीमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक प्रशासन, अधिकारी यासाठी गंभीर नाही. गेल्या दोन वर्षांत फार बदल झालेला नाही. पण आता हा सगळा प्रकार आता थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रकार बंद होणार नाही आणि गावात अस्वच्छता असेल त्या गावाला मोफत तांदूळ मिळणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...