अनाथ,अपंग,मतीमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

free medical check camp,pune,kothrud

वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कोथरूड यांच्या तर्फे डॉ. पु. अचलऋषी म.सा चादरप्रधान समारोह निमित्ताने.अनाथ,अपंग,मतीमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत अनाथ,अपंग,मतीमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मानवता हाच धर्म हे डोळ्यासमोर ठेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. आशिषजी रानडे, डॉ.जाधव,डॉ जैन,डॉ सतीशजी जैन,डॉ सुजय लोढा, डॉ गुणवंजी ओस्तवाल, डॉ. श्रेयस कपाले इत्यादी डॉक्टर शिबिरात मुलांना तपासणार आहेत. हे शिबीर छत्रपती संभाजी विद्यालय शिवाजी पुतळ्याजवळ कोथरूड पुणे घेण्यात येणार आहे.

समाजासाठी सामाजिक तत्परतेने कार्य करणारे व आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजसेवा करणाऱ्या व समाजापुढे एक नवीन आदर्श उभा करणारया समाजबांधवांना वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कोथरूड यांच्या तर्फे तीन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
१) मानवरत्न पुरस्कार- उद्योगपती माणिकचंदजी नारायणदासजी दुगड यांना मानवरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
२) आदर्श पिता पुरस्कार- भागचंद्जी लखीचंद्जी छाजेड यांना देण्याय येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
३) दानभूषण पुरस्कार- नैपतलालजी भगवानदासजी साकला यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी दानभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल

Loading...

पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत यशवंतराव नाट्यगृह शिवाजी पुतळा चौक कोथरूड येथे संपन्न होणार आहे.पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, तसेच जनसेवा फौंडेशनचे डॉ.विनोद शहा, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, विजयकांत कोठारी,पोपटलालजी ओस्तवाल,कुंदनमलजी दरडा,गौतम ल्ब्धीचे अशोक नहार, प्रसिद्ध मधुमेह तज्ञ अभयजी मुथ्था हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील या प्रसंगी शिबिरात मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.डॉ. आशिषजी रानडे, डॉ.जाधव,डॉ जैन,डॉ सतीशजी जैन,डॉ सुजय लोढा, डॉ गुणवंजी ओस्तवाल, डॉ. श्रेयस कपाले इत्यादी डॉक्टर यामध्ये समावेश आहे. पुरस्कार वितरणसाठी वतर्मान आचार्य प पु . डॉ शिवमुनीजी म .सा , प.पु .युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा.,आदर्शऋषी म.सा,अक्षयऋषीजी म.सा. प्रशांतऋषीजी म.सा,प्रीतिसुधाजी म.सा,अलोकऋषी म.सा,प्रियदर्शनाजी म .सा. तसेच देशभरातील जैन साधू ,मुनी , शुभसंदेश पाठविले आहे.

प. पु. डॉ.अचलऋषी म.सा चादरप्रधान समारोह-
पंडित रत्न पद्मश्री म .सा. व प. पु. डॉ. अचलऋषी म.सा यांचा चातुर्मास कोथरूड येथे जोरात सुरु आहे. अचलऋषी म.सा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यत अनेक गरजूंना शिबिराचा फायदा झाला आहे. यावर्षी अचलऋषी म.सा चा सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रम असल्यामुळे कोथरूड जैन श्रावक संघा त्यांचा सन्मान करणार आहे. तसेच याकरताच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी