गरिबांना मोफत धान्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली पंतप्रधान मोदींची तोंडभरून स्तुती

blank

मुंबई : ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी म्हटलं आहे.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू, दोन्ही बाजूचे पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी व्हिसीमध्ये पंतप्रधानांना या योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे ७ कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मागील तीन महिन्यात आपण गरीबांना मोफत अन्न धान्य दिलं. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असं धान्य मोफत दिलं. अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेचा लाभ देशातल्या ८० कोटी लोकांना घेता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

वो हमारा मैप बिगाड़ेंगे, हम उनके ऐप उखाड़ेंगे; वाह मोदीजी वाह !!

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं आहे. ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरु राहणार आहे. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो चणाही मोफत दिला जाईल. यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते. संपूर्ण भारतासाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं… अनेक राज्यांनी करोना काळात चांगलं काम केलं आहे. त्यांना आपण आवाहन करतो आहोत की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठीही त्यांनी सहकार्य करावं. याचा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगारासाठी आपलं गाव सोडून इतर राज्यांमध्ये जातात. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.