fbpx

अहमदनगरमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

अहमदनगर / भिंगार : मृत्यू नंतर माणूस स्वतःबरोबर काहीच घेऊन जात नाही असं म्हणतात. पण खरंतर त्यासोबत लाखोंची नैसर्गिक संपत्ती नष्ट होते. माणूस जिवंतपणी जेव्हा आपला एखादा अवयव गमावतो किंवा आजाराने ग्रस्त होतो तेव्हा आपला शरीर किती अमूल्य आहे हे कळते.मग माणूस अगदीच गरीब असो वा श्रीमंत , हिंदू असो वा मुस्लिम , निसर्गाने कोणताही बदल शरीर रचनेत केलेला नाही . आज विज्ञानाने मोठी प्रगती केलीये . किडनी , लिव्हर , डोळे , हृदय यांचे आज पर्यंत यशस्वी ट्रान्सप्लँट केले आहे. आता मेंदू ट्रान्सप्लँटचाही अभ्यास सुरू आहे.

माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर फक्त मृतशरीर म्हणून उच्चरले जाते . पण जिवंतपणी ते शरीर निरोगी राहण्यासाठी आणि मृत्यूनंतरही दुसऱ्या शरीराला आधार देण्यासाठी अवयव दानाचे महत्व जाणून अहमदनगर मध्ये नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच नेत्रदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री . उल्हास शरद मुंगी यांच्या स्मृतिदिना निमित्त के.के.आय.इन्स्टिट्यूट (बुधरणी हॉस्पिटल ) पुणे , फिनिक्स फाउंडेशन आणि मुंगी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रविवार दि. 25 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. अहमदनगर मधील भिंगार कॅम्प , चौंडेझवरी माता मंदिर , सारपण गल्ली येथे पार पडेल .

या शिबिराचे आयोजन समाजसेविका श्री.ज्योत्स्ना उल्हास मुंगी , कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य सौ.शुभंगीताई साठे, मा.श्री. बाळासाहेब साठे, आणि फिनिक्स फाउंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले असून भिंगार आणि अहमदनगर परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि नेत्रदानाचा संकल्प करावा अस आवाहन करण्यात आले आहे.