औरंगाबाद घाटी मध्ये मोफत कर्करोग आरोग्य तपासणी शिबीर

औरंगाबाद : जागतीक महीलादिनानिम्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात मोफत कर्करोग आरोग्य तपासणी शिबीर ( दि ६) सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहने गरजेच आहे म्हनुन वैद्यकीय शिक्षनमंत्री गिरीष महाजन यांच्या संक्लपनेतुन महिलामध्ये कर्करोगाबाबत जनजागरुती करण्यासाठी स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग, क्ष-किरण विभाग आणि शल्य चिकित्साशास्त्र विभागाच्या संयुक्तविद्यामाने या शिबीराचे आयोजन घाटीच्या ओपीडी येथे राबवण्यात येत  आहे.

महीलानी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कर्करोग कसा ओळखावा , त्याची लक्षन कोणती, तो कुणाला होवू शकतो  आणि त्यावर कोणत्या चाचण्या  कराव्या आशी माहिती सागंत अधिक्षता डाँ कानन येळीकर यांनी शिबाराचे उदघाटन केले. मुखाचा कर्करोग,स्तन कर्करोग,गर्भाशयाचा कर्करोग याची माहिती पाँवर प्रेझिंटेशनद्वारे रुग्णांना दिली. शिबीरात उपस्थित महिलांची सामान्य आरोग्य तपासणी केली. डाँ श्रीवासन गडप्पा यांनी या आजारावर लस ही उपलब्ध असल्याचे सांगितले. शिबीरामध्ये डाँ र्वषा रोटे, डाँ. मगंला बोरकर याच्यांसह विविध विभागाचे डाँक्टर व महिलांची उपस्थितिती होती.

Comments
Loading...