सरसंघचालक भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगून केंद्रीय मंत्र्याची फसवणूक

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगून एका व्यक्तीने केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह व त्यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामुळे मंत्रालयात खळबळ उडालीये. अविचल असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर येतीये.

bagdure

दरम्यान याप्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अविचल नामक या व्यक्तीने चौधरी वीरेंद्र सिंह यांचे खासगी सचिव सुधीर फोगाट यांना मोबाइल कॉल केला आणि तो स्वत: डॉ. मोहन भागवत यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे चौधरी वीरेंद्रसिंह स्वत: त्याच्याशी बोलले. शहानिशेनंतर अशी कुणी व्यक्ती सरसंघचालकांची सहाय्यक नाही व ज्या मोबाइलव नंबरवरुन कॉल आला होता तो नंबरही डॉ. भागवत यांच्या कार्यालयातील कुणाचाच नाही, असे संघाच्या दिल्ली कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीचे भाजपच्या अनेक मंत्र्यांशी चांगले सबंध असल्याचं देखील वृत्त आहे. एव्हढंच नाही तर त्याने स्टील आॅथोरिटी आॅफ इंडियाचे (सेल) कार्यकारी संचालक अलोक सहाय यांनाही कॉल केला होता . डॉ. भागवत यांच्याशी जवळीक आहे. सेलचे अध्यक्षपद ३१ जुलैला रिक्त होत असून या पदावर वर्णी लावण्यासाठी मी आपली मदत करू शकतो, असे त्याने सहाय यांना सांगितले होते. दरम्यान सहाय यांनी अधिक चौकशी केली असता, अशा कुठल्याही व्यक्तीचा संघाशी सबंध नसल्याचं संघाच्या नागपूर कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

You might also like
Comments
Loading...