स्टेट बँक ऑफ इंडियाने नोकरी नाकारली पठ्ठ्याने डुप्लिकेट बँकच सुरु केली…

Open State Bank Account!

तामिळनाडू : श्रीमंतीचा शोर्टकट घेण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. बँकेत चोरी करण्यासाठी तर चोर काय शक्कल लढवतील याची गॅरंटी नाही. आता तर ऑनलाईन बँक फ्रॉडच्या घटना देखील वाढल्या आहेत. मात्र, तामिळनाडू राज्यात एक अशी घटना समोर आलीय, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. कुडलूर जिल्ह्यातील परूती येथे चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचीच डुप्लिकेट शाखा चालवण्यात येत होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा असून तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. कमल बाबू याचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करत होते. 10 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर नुकतेच कमल बाबू याने नोकरीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज केला होता मात्र त्याला बँकेत नोकरी नाकारण्यात आली होती.

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ भागात दमदार पावसाची शक्यता

मग कमल बाबू याने बँकेत नोकरी नाही तर स्वतःची स्टेट बँकच सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे आणली होती. पनरुती बाजार शाखेच्या नावावर एक वेबसाइट देखील तयार केली आहे. बाबू याने साथीदार ए कुमार (वय 42) आणि एम मण्णीकम (वय 52) यांच्या मदतीने एप्रिल महिन्यात शाखा उघडली. लॉकडाऊनमध्ये आपल्याला कोणी पकडणार नाही, असा त्यांचा समज होता.

एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजारपेठेत नव्याने उघडलेल्या शाखेची माहिती शहरातील विद्यमान शाखेच्या व्यवस्थापकाला विचारल्यानंतर ही शाखा रडारवर आली. डुप्लीकेट शाखेतून घेतलेली पावती एका ग्राहकाने दाखवल्यानंतर मॅनेजर आणि इतर अधिकारी बनावट शाखेत गेले. तिथे मूळ बँकेच्या शाखाप्रमाणेच सेट पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पररुती पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 473, 469, 484, 109 अन्वये अटक करण्यात आली.

पुण्यात लग्नाचा जल्लोष भोवला; नवदाम्पत्यासह ३५ वऱ्हाडी पॉझिटिव्ह, तब्बल सात गावं सील