आरटीओ कार्यालयाची फसवणूक, चौघांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : जप्त वाहनाचे बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयाची फसवणूक करण्यात आल्याचा हा प्रकार १३ मे २०१९ ते ऑक्टोबर २०२० या काळात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.एम.के.पीयुसी सेंटरचे मालक मुजीब खान (रा.सिल्कमिल कंपाऊंड, बीड बायपास) यांनी कार क्रमांक (एमएच-२०-सीटी-८२११), साई पीयुसी केंद्राचे कैलास किसन पवार (रा.एच.पी.ऑटो सेंटर, वाळूज) यांनी कार क्रमांक (एमएच-२०-बीटी-७९४८), खासगी प्रवासी बस क्रमांक (एमएच-२०-डीडी-९५५१) व अन्य एका वाहनाचे बनावट पीयुसी प्रमाणपत्र तयार करून आरटीओ कार्यालयात सादर केले होते.

याप्रकरणी आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक शेख फिरोज सुभान (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बनावट पीयुसी प्रमाणपत्र तयार करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डुकरे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या