करणीच्या नावाखाली महिलेची सहा लाखांची फसवणूक, भोंदूबाबावर गुन्हा

बीड : तुमच्या घरातील करणी-भानामती व गुप्तधन काढून देतो, असे म्हणून एका पस्तीस वर्षीय महिलेची सहा लाख रूपये आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिस ठाण्यात भोंदुबाबा विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आडस येथील वैजनाथ म्हेत्रे हा भोंदूबाबा मागील २५ ते ३० वर्षांपासून जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन करणी-भानामतीच्या नावाखाली सामान्यांची अर्थिक लूट करून महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याचे राजरोसपणे उल्लंघन करत आहे. स्वाती दत्ता खाडे या महिलेचे पती शेती करून तीन मुली असे अपत्ये असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. वर्षभरापूर्वी वैजनाथ म्हेत्रे हा खाडे यांच्या घरी गेला. त्याने तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते मी काढून देतो. मात्र, त्यापूर्वी तुमच्यावर केलेली करणी-भानामती काढावी लागते. ती मी काढतो असे सांगितले.

दत्ता खाडे यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून २६ जानेवारी रोजी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर वेळावेळी असे एकूण सहा लाख रुपये दिले. यानंतरही त्याच्याकडून पैशाची मागणी सुरूच होती. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वैजनाथ म्हेत्रेविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP