नोकरी देण्याच्या बहाण्याने थेट मोदींच्या नावे होतेयं फसवणूक; पीआयबीने केले सावध

पीआयबी

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात  आले. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले तर अनेक लोक बेरोजगार  झाले. अनेक लोकांवर यामुळे आर्थिक संकट ओढवले. यासाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. नोकरीची गरज असलेल्या तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी ठराविक शुल्क वसूल करण्याचे प्रकार समोर येत आहे.

यातील फसवणूक करणारे गुन्हेगार थेट मोदी सरकारच्या नावे फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. पीएम रोजगार योजनेची वेबसाइट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेकने याबाबत लोकांना सावध केले आहे.

याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीटमध्ये करत म्हटलं की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाइटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि १०० रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे. ही वेबसाइट आणि हे नोटिफिकेशन फेक आहे. अशा कोणत्याही वेबसाइटला बळी न पडण्याचे आवाहन पीआयबी केले आहे.

असे करा फॅक्टचेक –

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारे पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता.

व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल.

त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि [email protected] ईमेलद्वारे संपर्क करू शकता.

सध्या नोकरी देण्याच्या बहाण्याने सुरू असलेली ही लूटमार वाढतच चालली आहे. आता तर थेट पंतप्रधान मोदी यांच्या नावाने हा प्रकार घडत असल्याने PIBFactCheck ने वेळीच हा मुद्दा नागरिकांच्या निदर्शनास आणून देत सावधानतेचा इशारा दिला आहे.

IMP