राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर आठ दिवसांपूर्वी शिरूर येथे अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा आठ दिवसांतच शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोमवार (दि.15) किशोर व्यंकटराव देशमुख (रा. मलठण, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास विठ्ठलराव बांदल, श्रीकांत ज्ञानोबा विरोळे (दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर), राहुल वसंत टाकळकर (रा. हिवरे, ता. शिरूर) यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण येथील किशोर देशमुख यांनी 2001 मध्ये खंडाळे (ता. शिरूर) येथे जमीन गट नंबर मधील 21 गुंठे जमीन खरेदी केलेली होती. परंतु देशमुख यांच्या काही व्यावसायिक अडचणीमुळे त्यांना विक्री करायची होती. त्यावेळी देशमुख यांचेच मित्र असलेले किशोर देशमुख यांना बांदल यांनी मलाच जमीन घ्यायची आहे. “तुझी जमीन मी घेतो’ असे सांगितले. पंधरा दिवसांनी बांदल यांनी देशमुख यांना शिक्रापूर येथे जमिनीचा व्यवहार करण्यासाठी बोलाविले. त्यावेळी बांदल यांच्या सोबत या जमिनीचा व्यवहार हा सत्तावीस लाख रुपयांना ठरला असताना बांदल यांनी देशमुख यांना मी सांगेल त्या दिवशी तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ये तेथे आपण जमिनीचे खरेदीखत करू आणि तुला तेव्हा लगेचच सगळे पैसे देऊन टाकतो, असे सांगितले.

त्यानंतर 19 मे 2010 रोजी मंगलदास बांदल यांनी देशमुख यांना जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे बोलाविले. त्यावेळी देशमुख तेथे गेलेले असताना त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयासमोर श्रीकांत विरोळे व राहुल टाकळकर हे दोघे भेटले. त्यांनी देशमुख यांना बांदल हे येथे येणार नसून तुमची जमीन श्रीकांत विरोळे यांच्या नावावर करून द्यायची आहे. तेव्हा देशमुख यांनी बांदल यांना फोन केला. जमिनीचा व्यवहारात तुमच्यासोबत ठरलेला आहे. जमीन तुमच्या नावावर करायची आहे, असे सांगितले असताना बांदल यांनी श्रीकांत विरोळे हा माझा जवळचा आणि विश्वासू सहकारी आहे. ते सांगतील तशी जमीन त्यांच्या नावावर करून दे, मी दोन दिवसांनी तुला ठरलेली रक्कम देतो, असे सांगितले. त्यावेळी देशमुख यांनी बांदल यांच्या सांगण्यावरून ही जमीन श्रीकांत विरोळे यांच्या नावावर करून दिली. त्यांनतर दोन दिवसांनी देशमुख यांनी बांदल यांना व्यवहारातील रकमेसाठी फोन केला असताना बांदल यांनी देशमुख यांना त्यांच्या पुणे येथील घरी बोलाविले. परंतु बांदल हे भेटले नाही. त्यावेळी देशमुख यांनी फोन केला असताना बांदल यांनी मी बाहेरगावी आलो आहे.

चार ते पाच दिवसांनी तुला फोन करून बोलवून घेतो, असे सांगितले. त्यानंतर बांदल यांनी देशमुख यांना पैशाची मागणी केली. वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर देशमुख यांनी वेळोवेळी श्रीकांत विरोळे व राहुल टाकळकर यांना सांगितले. परंतु त्यांनी देखील प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे किशोर देशमुख यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ