स्मृती इराणीविरुद्ध पुण्यात फसवणूकीचा खटला दाखल !

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा नेत्या स्मृती इराणीविरुद्ध पुण्यात २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी फसवणूकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला आहे.

भाजपा नेत्या स्मृती इराणी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केला . याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी. अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़ एस़ गायकवाड यांच्या न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला असून त्यावर लवकर न्यायालयात आदेश देण्याची शक्यता आहे़.