फसवणुकीचा प्रयत्न, तिघांना चार वर्षांची शिक्षा

crime

सोलापूर : सोलापूर दुसऱ्याच्यानावे असलेली जागा तीच व्यक्ती आहे असे भासवून तसेच बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. जगताप यांनी सुनावली.

उमाकांत लक्ष्मम बुगडे (वय ५७, रा. जोडभावी पेठ), वसंत रामय्या तुम्मा (वय ५८, रा. भवानीपेठ), ईश्वरप्पा रामलू मुटकेरी ( वय ३५, रा. ग्रुप जुना विडी घरकुल, सोलापूर) यांना शिक्षा झाला आहे. मोहन गोसकी याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. तो घटनेपासून फरार होता. खटला सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना ३० सप्टेंबर २०१३ रोजी उत्तर विभाग सहायक निबंधक कार्यालयात घडली होती. सहायक निबंधक पांडुरंग कुलकर्णी यांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. मजरेवाडी गट नंबर १५८ – १- २- फ्लॉट नंबर ही जागा राजेंद्र बाळकृष्ण तडवळकर यांची होती.

ती जागा गोसकी याला उमाकांत हा विकणार होता. अन्य दोघेजण साक्षीदार होते. खरेदी खत करताना संशय आल्यामुळे कुलकर्णी यांनी थेट तडळवकर यांनाच फोन केला. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. सहा साक्षीदार तपासण्यात आले. स्टॅम्प व्हेंडरची साक्ष घेण्यात अाली. सरकारतर्फे अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.