चार वर्ष होऊनही दाभोळकरांचे मारेकरी मोकाटच

आणखी किती विचारवंतांच्या हत्यांची वाट सरकार बघतंय?; हमीद दाभोळकर

आज डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली . याच पार्श्वभुमीवर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्याकडुन मोर्चा तसेच ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.

दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष होऊनही अजून मारेकरी पकडले गेले नाहीत . सनातनवर चार्जशीट दाखल असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आणखी किती विचारवंतांच्या हत्यांची वाट सरकार बघतंय? असे अनेक प्रश्न हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केला .या मोर्चात कार्यकर्त्यांसह हजारो तरुण, लेखक सहभागी झाले होते.

सोशल मिडीयावर ‘जवाब दो’

महाराष्ट्र अंनिसकडून सोशल मीडियातून मोठी मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेतून विवेकवाद्यांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल सरकारला जाब विचारला जात आहे. #JawabDo ‘जवाब दो’ या हॅशटॅगचा वापर करत, 20 ऑगस्ट 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सरकारला जाब विचारला जात आहे.

अंनिसच्या या मोहिमेला विविध क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुभाष वारे यांसारख्या दिग्गजांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवत फेसबुक-ट्विटरवर हॅशटॅग वापरुन पोस्ट केल्या आहेत.

 

You might also like
Comments
Loading...