fbpx

भारता विरोधात अपप्रचार करणारी चार ट्विटर हँडल्स निलंबित

टीम महाराष्ट्र देशा- काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या अनुषंगानं भारता विरोधात अपप्रचार करणारी चार ट्विटर हँडल्स निलंबित करण्यात आली आहेत. काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांच्या सूचनेनुसार ही कारवाई करणयात आली असल्याचं अधिकृत सूत्रांनी काल सांगितलं. अशाच आणखी चार ट्विटर हँडल्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र गुप्तता आणि सुरक्षेच्या कारणास्तव याबाबत काही माहिती देण्यास ट्विटरच्या प्रवक्त्यानं नकार दिला.

दरम्यान, केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात कलम १४४ लागू आहे. गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील बाजार बंद आहेत. मात्र, ईदच्या निमित्ताने कलम १४४ शिथील केले. यामुळे बाजार, बँका खुल्या झाल्या. श्रीनगर, शोपियांमध्ये देखील शांततेत ईद साजरी झाली. जम्मूतील ईदगाहमध्ये सुमारे ४५०० लोकांनी नमाजपठण केले.

महत्वाच्या बातम्या