लोकसभेची सेमीफायनल- चार वेळेस मुख्यमंत्री, या निवडणुकीत पराभूत

कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर मध्यप्रदेश मध्ये अजून चित्र अस्पष्ट आहे.

मिझोराम विधानसभेत मिझो नॅशनल पक्षाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे, तर सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला फक्त सहा जागांवर आघाडी घेता आली आहे. मिझोरामचे चार वेळचे मुख्यमंत्री लालथनवाला यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. लालथनवाला यांनी दोन जागेवरून निवडणुक लढवली होती. त्यामधील चाम्पाईमध्ये लालथनवाला यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा मिझो नॅशनल या पक्षाच्या टीजे ललनुंतलुआंगा यांनी पराभव केला.