एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह चौघांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी

elgar parishad pune

पुणे: एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह ,रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत या चौघांना १४ जून पर्यंत जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या चौघांना काल वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली होती. काल अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांचे माओवाद्यांशी कनेक्शन असून, सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली आहे. या सर्व संशयितांविरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचही ते म्हणाले. तर रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्या झाडाझाडतीत माओवाद्यांचे पैसे एल्गार परिषदेत वापरले गेल्याचं पुरावे मिळाल्याच कदम यांनी सांगितले.

दरम्यान, कोरगाव भीमा शौर्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनावर पुणे पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही परिषद आयोजित करण्यासाठी माओवाद्यांच्या पैसा लागल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली आहे. तर रोना विल्सन यांच्याकडून मिळालेल्या पत्रामध्ये भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसच्या नावाचा उल्लेख असल्याने तेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पुणे पोलिसांनी काल मोठी कारवाई करत मुंबई , दिल्ली आणि नागपूर येथून अनेकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग, माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित एक पत्र मिळाल आहे. मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन ला पत्र लिहलेले आहे. ज्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख आहे. मात्र त्यांचा संबंध या लोकांशी आहे की नाही याचा तपास सुरू असल्याचही त्यांनी सांगितले.Loading…
Loading...