पत्रकाराच्या आई व मुलीच्या हत्येप्रकरणी ४ जणांना अटक

नागपूर : पत्रकार रवी कांबळे यांच्या आई व मुलीच्या हत्येप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तसेच नागपुरातील किराणा दुकानदार गणेश शाहू याची पत्नी आणि भावांनाही अटक करण्यात आली आहे.

पत्रकार रवी कांबळे यांच्या आई व मुलीची हत्या किरकोळ आर्थिक वादातून झाल्याची माहिती सोमर आली होती. किरणा दुकानदाराने चिमुकल्या मुलीची आणि आईची आर्थिक वादातून निर्घृण हत्या केली.

शनिवारी नागपुरातल्या न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या ५५ वर्षीय आई उषा आणि दोन वर्षांची मुलगी राशी यांची हत्या करण्यात आली होती. शनिवार संध्याकाळपासून आजी-नात बेपत्ता होत्या, त्यानंतर रविवारी त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले सापडले होते. गणेशची पत्नी गुडिया शाहू आणि भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही आजी-नातीच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीचाही गुन्हा नोंदवला आहे.