भूत दिसल्याचा दावा करणाऱ्या चार जणांना अटक

blank

पिंपरी-चिंचवड- पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात ज्याठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी भूत असल्याचा दावा करणाऱ्या कामगारांना तसेच मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. नुकताच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला होता.या प्रकरणी चार कामगारांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.त्यातील ठेकेदार आणि तीन कामगारांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.तर एक कामगार अद्याप फरार आहे.

याप्रकरणी मांत्रिक (कामगार)अमर गोवर्धन चौधरी वय-५१ रा.दिघी रोड भोसरी.शशिकांत गणेश चौहान वय-३५ रा.भोसरी.अरूण अनुप्रसाद चौहान वय-५१ रा.भोसरी.ठेकेदार आनंद निर्मलसिंग गील वय-३२ रा.निगडी प्राधिकरण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर तर श्रीकांत कुमार हा कामगार फरार आहे त्याचा शोध पिंपरी पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आचार्य अत्रे नाट्यगृहात गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते.मात्र एका अंधाऱ्या कोपऱ्यात काम सुरू असताना,एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा आणि तिच्या बांगडय़ांचा आवाज होत असल्याचा भास काही कामगारांना झाला होता.त्यामुळे तेथे भूत असल्याच सांगत तेथून सर्व कामगारांनी पळ काढला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच कामगारामधील एकाने विधिवत पूजाअर्चा केली होती.त्यानंतर बंद पडलेले काम पूर्ववत सुरू झाले होते.