शिवबंधन बांधलेले मनसेचे ‘ते’ चार नगरसेवक घर वापसी करणार ?

टीम महाराष्ट्र देशा: मनसेला रामराम करत शिवबंधन हातात बांधणारे मनसेचे चार नगरसेवक घर वापसी करणार असल्याच सांगितल जात आहे. दरम्यान मनसेकडून चार नगरसेवकांना संपर्क करण्यात आला आहे. तर पुन्हा माघारी येण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेत मनसेचे एकूण सात नगरसेवक होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा संबंधित नगरसेवक मनसेमध्ये परतणार असून त्यांनी राज ठाकरेंची चर्चा केल्याचा दावाही मनसेकडून करण्यात आला आहे.

 Loading…
Loading...