Narayan Rane | पुणे : केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्री पुरते मर्यादित राहिले असल्याचं राणे यावेळी बोलताना म्हणाले. शिवसेना आता राहिलेली नाही. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुण्यात केला.
उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली आहे. 56 आमदारावरुन सहा सातवर आले आहेत. त्यातील काही ऑन दी वे आहेत. ते कधीही सहभागी होती. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा दावा नारायण राणे यांनीं केला आहे. आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राणेंची ही सवयच आहे. चार पक्षात गेले त्यांनी काय केलं. हे सांगायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा फूल फॉर्म सांगावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी राणेंना लगावला.
राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरती सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जातेय. याबाबत राणे म्हणाले, “फोटो दिला तर बिघडले कोठे ? तुम्हाला त्याच एवढंच वाईट वाटत असेल तर त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना कीट द्या. परंतु संकुचित वृत्ती ठेवू नका.”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगलं काम केलं आहे. तसेच ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असं देखील ते म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या राजकीय आरोप- प्रत्यारोपांमुळे राजकारणातील स्तर खालावत चालला असल्याचं चित्र आहे. या संदर्भात राणे म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. मला राजकारणातील स्तर घसरू नये, असे वाटते. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात राणे म्हणाले, “याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नसल्याचं राणे म्हणालेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना आणि चिन्ह यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरुपात पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. उर्वरित आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत आहेत. अशातच पुन्हा एकदा नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत फूट पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून त्वचेवरील टॅनिंग करा दूर
- Sushma Andhare । मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे म्हणाल्या…
- Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Vaibhav Naik | “हिम्मत असेल तर निलेश राणेंनी…”; वैभव नाईकांचं खुलं आव्हान