मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंडसोबत एक कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळवली जाणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ गुरुवारपासून (२३ जून) इंग्लंडच्या काऊंटी संघ लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे या सराव सामन्यात टीम इंडियाचे चार खेळाडू लीसेस्टरशायरकडून खेळणार आहेत. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णा लीसेस्टरशायर संघाकडून खेळणार आहेत.
भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, जिथे पाचवा सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला होता. भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्याने टीम इंडियाच्या सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सामना सराव करण्याची संधी मिळणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंट पाहता दोन्ही संघातून १३-१३ खेळाडू खेळतील. भारत विरुद्ध लीसेस्टरशायर सराव सामना २३ ते २६ जून दरम्यान खेळवला जाईल. हा सामना दुपारी तीनपासून सुरू होईल.
The grind is 🔛#TeamIndia sweat it out in the nets in the lead up to the rescheduled fifth #ENGvIND Test. 💪 pic.twitter.com/IZhxSLkAwH
— BCCI (@BCCI) June 23, 2022
दोन्ही संघ –
लीसेस्टरशायरः सॅम्युअल इव्हान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम्युअल बॅट्स (विकेटकीपर), नॅथन बॉली, विली डेव्हिस, जो इव्हिसन, लुईस किम्बर, एविडाइन स्कंदे, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णा.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –