Karnataka Election; कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कालच भाजपने काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.

राजा व्यंकटप्पा नायक, वेंकट राव हे जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता आहेत.कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. आज सकाळी येडीयुरप्पा यांची  विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.

Loading...

दरम्यान,कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे.

 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला