कोरोनाने केला टोमॅटोचा रेंधा! ‘कोरोना’ने नासवले शेतकऱ्याचे चाळीस लाखाचे टोमॅटो!

blank

तुळजापूर – कोरोनाक्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन शेतकरी वर्गाचा मुळावर उठला असुन तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील एका शेतकऱ्याचा शेतातील आठ एकरातील टोमॅटो विकता येत नसल्याने तो जागेवरच सडत असुन यामुळे शेतकऱ्याचे सुमारे चाळीस ते लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.

आठ एकरातील सडत चाललेले टोमॅटोची झाडे काढुन टाकण्यासाठी व पुन्हा नव्याने प्लाँट तयार करण्यासाठी जवळपास चाळीस ते पन्नास हजार खर्च येत असल्याने आता करावे काय असा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन लागु केली यामुळे दळणवळण बंद असल्यामुळे आडत मार्केट बंद असल्याने याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतमाल विकण्यावर झाला आहे.

यात विशेषतः शेतकऱ्याचा हाताशी आलेला भाजीपाला विकता येत नसल्याने तसेच पोटच्या पोरासारखे वाढविलेले टोमॅटो डोळ्या देखत शेतात नासत आहेत.काहीही अशीच पारिस्थिती तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील टोमॅटो पिकवणा-या राजाभाऊ रोचकरी यांच्यावर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील राजाभाऊ रोचकरी यांनी आपल्या आठ ऐकर क्षेत्रात टोमॅटो लावले. त्यांनी सतत दुष्काळाशी लढत लढत योग्य नियोजन करुन टमाटे शेती जोपासली आहे .

या टोमॅटो शेतीसाठी सुमारे बारा लाख खर्च आला आता यातील टोमॅटो विक्रीस सोलापूरला घेऊन जाण्यास आरंभ होताच कोरोना आला आणि आडत मार्कट बंद झाले. त्यातच वाहने बंद यामुळे टोमॅटो गेल्या एक महिन्यापासुन जागेवरच सडून जात आहेत. यातील एका झाडाला १३० किलो टमाटे लागतात.तर साधारण किलोला ३ ते ४ रुपये भाव मिळाला तरी चाळीस ते पंचेचाळीस लाख उत्पन्न मिळते असते. पण टोमॅटो ला मार्केट नसल्याने या उत्पन्नावर पाणी पडले आहे.

सध्या या आठ एकरात सडक्या टोमॅटो चा सडा पडला असुन ही घाण काढुन पुन्हा रान तयार करण्यासाठी तीस ते चाळीस हजार खर्च येणार असल्याने आता करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असुन सध्या हा शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.

मदती शिवाय उभे राहणे कठीण –

दुष्काळ अतिवृष्टी अदि संकटात कसबसे टोमॅटो शेती वाचवली. तर कोरोना संकटाने टोमॅटो शेतीची वाट लावली असुन आता जगावे कसे असा प्रश्न पडला असुन आमच्या या पिकाचे पंचनामे करुन मदत दिल्याशिवाय आम्हाला नव्यानै शेती करणे शक्य होणार नसल्याची प्रतिक्रिया ‘ महाराष्ट्र देशा ‘ ला राजाभाऊ रोचकरी या शेतकऱ्याने दिली.